१) गुळापासुन बनवलेले पदार्थ प्रत्येक अमावास्येला श्री शनिदेवाला
नैवेद्य दाखवुन जास्तीत जास्त लोकांमध्ये वाटावा, गुळाची गोड पुरी सरसोच्या तेलात
तळलेली असेल तर अधिकच चांगली.
२) तिळाचे लाडु, तिळ गुळापासुन बनवलेली रेवडी प्रत्येक
शनिवारी श्री शनिदेवाला नैवेद्य दाखवुन सर्वांमध्ये वाटावी.
३) उडीद डाळीचे वडे सरसोच्या तेलात तळुन श्री शनिदेवाला
नैवेद्य दाखवुन सर्वांमध्ये वाटावी. आणि वडे कावळ्यांना अवश्य खाऊ घालावेत.
४) प्रत्येक शनिवारी सरसोच्या तेलात किंवा तिळाच्या तेलात
आपला चेहरा बघुन ते तेल कोणत्याही श्री शनि मंदिरात किंवा श्री हनुमान मंदिरात दान
करावे किंवा मंदिरात दिव्यासाठी वापरावे.
५) शनैश्चर अमावास्ये दिवशी सरसो चे १ लिटर तेल आपल्या
शत्रु पासुन मुक्तता किंवा विजय मिळवण्यासाठी वाहत्या पाण्यात सोडावे.
६) शनैश्चर अमावास्ये दिवशी गुळ, तीळ, उडीद, काळा कपडा,
तेल, लोखंडाचे कोणतेही भांडे कोणत्याही श्री शनि मंदिरात दान करा किंवा कोणत्याही
गरीब व्यक्तीस श्री शनि मंत्र म्हणत दान करा. ( प्रत्येक वस्तु कमीत कमी एक-एक पाव
असायला हवी ).
७) आपल्या घरातील नैॠत्य कोपर्यात अंधार ठेवा, हे स्थान
सर्वात अधिक ऊंच आणि वजनदार ठेवा व त्या अंधारी कोपर्यात ९ बदाम काळ्या कपडयात
बांधुन लटकवून द्या.
८) प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला गुळाचे पाणी द्यावे.
९) कोणत्याही दिवशी जर श्री शनीच्या कोणत्याही ३ नक्षत्रा (
अनुराधा, पुष्य, उत्तर भाद्रपद) पैकी एक नक्षत्र असेल तर श्री शनीच्या कोणत्याही
प्रिय वस्तुचे दान करावे. व ह्या दिवशी श्री शनि मंत्र पाठ केल्यास तो अधिक फलदायी
होतो.
१०) दररोज सकाळी सुर्योदयापुर्वी उठुन अंथरुणातच बसुन
दक्षिण दिशेस नमस्कार करावा आणि श्री शनीच्या १० नावाचा जप करावा.
( कोणस्थ, पिंगलो,
बभ्रु, कृष्णो, रौन्द्रायत, यम, सौरी, शनैश्चराय, मंद, पिपलादेन, संस्तुत )
११) कोणत्याही शनिवारी, कोणत्याही श्री शनि किंवा श्री
हनुमान मंदिरातील ब्राम्हणाकडून आपल्या उजव्या हातात काळा धागा बांधुन घ्या व
चांगल्या परिणामासाठी कमीत कमी ९ शनिवार असणे जरुरी आहे.
१२) शनिवारी काळे वस्त्र अवश्य वापरा. जेवणात उडीद डाळीचा
वापर अवश्य करा.
No comments:
Post a Comment